मनाशी….

 ठरवते खूप मनाशी झाल गेल सोडून द्यावे
तरीही काही केल्या मनाची घालमेल सूटत नाही

विसरावे की स्मृतीभंश व्हावा या कोंडीत अडकते
मनाचा गलबला अजिबात शांत व्हायला मागत नाही

पूर्वीच्या विश्वात आठवणी मला खेचून नेतात
कसं सांगू पूर्वीची ती आज मला सापडत नाही

प्रयत्न करूनही सहजासहजी मन मानत नाही
निसटलेल्या क्षणांचे परतावे का भंडावून सोडतात

आधीप्रमाणे ती त्याची सखीही होऊ शकत नाही
पहिल्यासारख तो ही आत्ता उल्हासी न राहिला

सबब काहीही असो माळ विस्कटून गेली कधीची
पुन्हा पुन्हा वेचून पूर्ववत‌ कुठे होतात दोन‌ मने

तूटल्यानंतर जोडूच शकत नाही अशी अस्तरे मौनाची
विणून घेतली आत्म्याच्या आभाळाने पुन्हा न तुटण्यासाठी
प्रियांका

Published by प्रतिबिंबित मन

accountant. love to write. writing name is spandan piyaache. i'm malwani girl with little dreams ahead

Leave a comment