Diary 25052022

 Diary writing 25-10-2022

आपण नेहमी अशक्य गोष्टींशी विण जोडतो. तात्पुरत्या व्यक्तींचे अनंत गुंतणे आपल्या मनात खोलवर घर करते. वाटते की आपण यातून सहज सूटत जाऊ पण अस होत नाही. चांदण्या, चंद्राचे अस्तित्व अवकाश‌ आहे. त्या अवकाशाला आपण समजून घेत नाही. समजले असं मानून किती घाई करतो. अपेक्षांचे डोंगर कमी व्हावेत म्हणजे डोळ्यांची नदी किनाऱ्याच्या शोधात वणवण फिरत शुष्क होईल. तरीही किनारा ही लाभणे इतके सोप्पं नाही. माणूस म्हणून आपण छोट्या दु:खांची ग्रहणे झेलण्यात फार लवकर पराभूत होतो. असो! तरी महाकाय दु:खे इतके सामर्थ्यशाली आहेत की वेळोवेळी आपले उत्तम शिक्षक होतात. उदासीच्या प्रहरात निराशेचे ढग आपली परीक्षा घेतात, आजमावतात. केवळ आपण ओळखलं पाहिजे की समोर काय वाढून ठेवलय...!

Published by प्रतिबिंबित मन

accountant. love to write. writing name is spandan piyaache. i'm malwani girl with little dreams ahead

Leave a comment